तिन्ही दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे भारताने पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडला

भारतीय लष्कर, नौसेना आणि वायुसेनेद्वारे आज सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय लष्कर, नौसेना आणि वायुसेनेद्वारे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना नवी दिल्ली येथे संबोधित करण्यात आले.

या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये वायुसेनेचे एअर व्हाइस मार्शल आरजीके कपूर, नौसेनेचे रीयर एडमिरल डीएस गुजराल आणि मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी भारतातर्फे भूमिका मांडली. यावेळी तिन्ही दलाच्या प्रतिनिधींकडून भारताकडून  पाकिस्तानच्या पाडण्यात आलेल्या एफ १६ लढाऊ विमानाचे अवशेष दाखवण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी तिन्ही दलांच्या प्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नांना देखिल उत्तरे दिली. यावेळी भारतातर्फे एफ १६ विमानांचे अवशेष दाखवण्यात आल्याने पाकिस्तान वायुसेनेतर्फे एफ १६ विमानांचा वापर न केल्याचा दावा खोटा ठरला आहे. तसेच या पत्रकार परिषदेद्वारे पाकिस्तानचा त्यांच्याद्वारे रिकाम्या जागेमध्ये हल्ला करण्यात आल्याचा दावा देखील फेटाळण्यात आला असून पाकिस्तानद्वारे करण्यात आलेला हल्ला हा भारतीय लष्कराच्या ठिकाण्यावर केंद्रित होता मात्र भारतीय वायुसेनेने दिलेल्या प्रतिउत्तरामुळेच पाकिस्तानचा हा हल्ला अयशस्वी झाल्याचे म्हणण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)