कराड – भारतीय सेनेतील मराठा लाईट इन्फंट्रीच्या विविध बटालियनच्या युवा अधिकाऱ्यांनी बेळगाववरून येवून छ. शिवाजी महाराजांच्या सेनेचे सरसेनापती हंबीरराव बाजी-मोहिते यांच्या तळबीड येथील समाधीस्थळास भेट देवून मानवंदना दिली. सरपंच जयवंतराव मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विजय दिवस कार्यालयासही भेट दिली.
यावेळी सचिव ऍड. संभाजी मोहिते, सहसचिव विलासराव जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विजयस्तंभ तसेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास भेट देवून मानवंदना दिली. लेफ्टनंट आकाश श्रीवास्तव, राहूल जाकोर, प्रितम फुकन, शिवम पांडे, विकास शर्मा, विकास कुमार, पियुश सैन, वरूण चन्नाली, सतीश बंडगर यांचा यात समावेश होता.