भारत-चीनच्या उद्योजकांचा होणार संवाद 

पुणे: द इंटरनॅशनल बिझनेस लिंकेज फोरम (आयबीएलएफ) व फॉर्च्युन प्लस तर्फे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रिकल्चरच्या सहकार्याने पुण्यात 27 ऑक्‍टोबर 2018 रोजी सातव्या चायना इंडिया फोरमचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकार या परिषदेचे पोस्ट पार्टनर स्टेट असून चायनीज पीपल्स असोसिएशन फॉर फ्रेंडशीप विथ फॉरेन कंट्रीज (सीपीएएफएफसी),चायना इंडिया फ्रेंडशीप असोसिएशन (सीआयएफए) व पोदार एंटरप्राइजच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद पार पडत आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, पोदार एंटरप्राइजचे व्यवस्थापकीय संचालक राजीव पोदार, अध्यक्ष व द इंटरनॅशनल बिझनेस लिंकेज फोरमचे संचालक मोहित कुमार आणि सत्यगिरी ग्रुपच्या एंटरप्राइज इन्फ्रास्ट्रक्‍चरचे दिनेश जोशी यांनी ही माहिती दिली.
या परिषदेत केंद्रीय व्यापारमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, भारतातील चिनी राजदूत ल्यू झाह्युई उपस्थित राहतील. याप्रसंगी बोलताना राजीव पोदार म्हणाले की, या परिषदेमध्ये 200 चिनी उद्योजक भाग घेणार आहेत. या परिषदेदरम्यान पाच सामंजस्य करार होणार आहेत.
प्रदीप भार्गवा म्हणाले की, चीन आणि भारतदरम्यान द्विपक्षीय व्यापार 85 बिलियन डॉलर इतका असून चीनच्या बाजूने झुकते आहे. यामध्ये भारतातून होणारी निर्यात 10 अब्ज डॉलर इतकी चिनी उत्पादने आता आपण रोजच्या कामकाजात असून त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलत आहे. म्हणूनच चिनी उत्पादनांची भारतात निर्मिती करून मेक इन इंडियाला अधिक बळ देण्याची गरज आहे. पुणे शहरामध्ये विविध संस्कृती व तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे सामर्थ्य असल्यामुळे पुण्यात ही परिषद होणे सुयोग्य आहे.
पोदार म्हणाले की, अमेरिकेने नुकतेच चीनवर लादलेल्या शुल्कामुळे भारतातील उत्पादनांना फायदा होणार आहे. चीनला निर्यात होणाऱ्या सुमारे 44 उत्पादनांना फायदा होऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)