फेडेक्‍स एक्‍स्प्रेसच्या प्रमुख पदावर राजेश सुब्रमण्यम

ह्यूूस्टन – मूळचे भारतीय असणारे राजेश सुब्रमण्यम वय (52) यांची मल्टिनॅशनल कुरियर कंपनी फेडेक्‍स एक्‍स्प्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. सध्या राजेश हे फेडेक्‍स कॉर्पोरेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष, मुख्य मार्केटिंग आणि कम्युनिकेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर नवीन वर्षात कंपनीची नवीन जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

राजेश यांचा जन्म केरळमध्ये झाला असून, त्यांनी आयआयटी मुंबई या ठिकाणी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तर न्यूयॉर्कमध्ये सायरा न्यूज विद्यापीठातून त्यांनी केमिकल इंजीनिअरिंगमधील मास्टर पदवी मिळविली आहे. राजेश हे मागील 27 वर्षांपासून फेडेक्‍स समूहाशी जोडले गेले आहेत. तर 2013 पासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फेडेक्‍सचे प्रमुख आणि सीईओ डेव्हिड ब्रॉनजेकने म्हटले आहे की, राजेश यांना जागतिक पातळीवरचा असलेल्या अनुभवाचा विचार करूनच त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)