कॅलिफोर्नियामध्ये भारतीय वंशाच्या पोलिसाची हत्या

न्यूयॉर्क: अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये भारतीय वंशाच्या एका पोलिस अधिकाऱ्याची काही सशस्त्र बंदुकधाऱ्यांनी हत्या केली आहे. कॉर्पोराल रोनिल सिंह असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ख्रिसमसच्या रात्री “ओव्हर टाईम’ करून ते वाहतुकीचे नियोजन करत असताना त्याच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.

त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच पोलिस दलातून मदत पथके रवाना झाली. सिंह यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हल्लेखोर सिंह यांचे वाहन घेऊन पळून गेले होते. पोलिसांनी सर्व्हिलन्स फोटोच्या आधारे मारेकऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा संशयित हल्लेखोर स्पेन किंवा लॅटिन अमेरिकेतील असण्याची शक्‍यता आहे, असे कॅलिफोर्निया महामार्ग पोलिसांनी म्हटले आहे. सिंह हे गेल्या 7 वर्षांपासून न्यूमान पोलिस दलामध्ये कार्यरत होते. त्यापूर्वी ते मर्स्ड कौंटीच्या शेरीफ विभागात कार्यरत होते. ते मूळचे फिजीचे रहिवासी होते आणि अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)