सुरक्षेच्या कारणास्तव अभिनंदन वर्थमान यांची बदली

नवी दिल्ली –  भारतीय सीमांमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पाकिस्तानात पिटाळताना पाकिस्ताच्या हाती लागलेल्या भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची गाथा अवघ्या देशाने अनुभवली आहे. काही दिवसांपूर्वीच विंग कमांडर अभिनंदन हे पुन्हा वायू दलात रुजू झाले होते. त्यानंतर आज विंग कमांडर अभिनंदन यांची श्रीनगर एअरबेसवरून बदली करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधून मायदेशी परत आल्यानंतर अभिनंदन वर्थमान यांच्यावर राजकीय नेते, मुत्सदी, संरक्षण रणनितीकार, माजी संरक्षण अधिकारी आणि सेलिब्रिटी सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यानंतर पुन्हा हवाई दलात अभिनंदन वर्थमान कार्यरत झाल्यानंतर, आज त्यांची सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर एअरबेसवरून पश्चिम विभागातील महत्त्वाच्या एअरबेसवर पोस्टिंग करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1119587242459181057

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)