भारतीय हवाई दलाचे बेपत्ता ‘एएन-32 ‘ विमानाचे अवशेष अखेर सापडले

नवी दिल्ली -भारतीय वायुसेनाचे 3 जून रोजी बेपत्ता झालेल्या एएन-32 विमानाचे अवशेष सापडले आहेत. विमानानं उड्डाण केलेल्या ठिकाणाहून 15 ते 50 किमी अंतरावर हे अवषेश सापडले आहेत. अरुणाचल प्रदेशमधील मेचुका भागातून 9 दिवसांपूर्वी हे विमान बेपत्ता झाले होते.

तेंव्हापासून विविध पातळ्यांवर करण्यात आलेल्या प्रयत्नांनंतरही या विमानाचा कोणताही ठावठिकाणा समजू शकलेला नव्हता. म्हणून मानाच्या शोधासाठी हवाई दलाने 5 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. रशियन बनावटीचे ‘एएन-32′ हे मालवाहू विमान 13 प्रवाशांना घेऊन आसाममधील जोरहाट येथून 12 वाजून 25 मिनिटांनी अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे रवाना झाले होते. पण, उड्डाणानंतर अर्ध्या तासात या विमानाचा जमिनीशी संपर्क तुटला होता.

https://twitter.com/ANI/status/1138383908859334656

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)