पाकिस्तानी सीमेजवळ भारतीय वायुसेनेचा युद्धसराव

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती कायम असताना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने गुरुवारी मध्यरात्री पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेजवळ युद्धसराव करुन पाकिस्तानी सैन्याची झोप उडवली. या अभ्यासात मोठ्या प्रमाणात भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाने भाग घेतला. यादरम्यान पंजाबच्या अमृतसर शहरातील स्थानिक लोकांना स्फोटांचे आवाज नेमके कुठून येत कळत नसल्यामुळे सोशल मिडीयावर लोकांद्वारे अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. यामुळे स्थानिक प्रशासन यांनी रात्री शहरात येऊन लोकांना कोणत्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहन केले.

तत्पूर्वी पाकिस्तानचे लढाऊ विमान जम्मू-काश्मीर येथील एलओसीवर दिसण्यात आले होते. यानंतर भारतीय हवाई दलाने अलर्ट जारी केले. तसेच 27 फेब्रुवारीला नौशेरा सेक्टरमध्ये आलेल्या पाकिस्तानी विमानाला भारतीय हवाई दलाने पळवून लावले होते. यादरम्यान विमानाचा पाठलाग करत भारताचे मिग 21 विमान पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. त्यानंतर  भारतीय वैमानिक अभिनंदन यांनाही पाकिस्तानी जनतेने घेरले होते. मात्र ऐनवेळी पाकिस्तानी लष्कराने तिथे पोहोचून त्यांना आपल्या ताब्यात घेतल्याने त्यांना कोणतीही हानी झाली नाही. तत्पूर्वी संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनने अडथळा आणल्यामुळे आता या परिषदेतील काही जबाबदार देशांनी मसुदबाबत अन्य पर्यायांचा विचार करायला सुरुवात केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)