भारतीय हवाईदलाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत केली घुसखोरी : पाक मेजर

नवी दिल्ल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून पाकवर कारवाई करण्याची मागणी होत होती. आज भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले आहेत.

पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)