भारतीय हवाई दलाने आपले शूटर्स माघारी बोलवले

नवी दिल्ली: भारत-पाक सीमेवर वाढता तणाव लक्षात घेत भारतीय हवाई दलाने दिल्लीत आयोजित शूटिंग विश्‍वचषक स्पर्धेत भाग घेणाऱ्या आपल्या शूटर्सना माघारी बोलावले आहे. रायफल शूटर्स रवी कुमार आणि दीपक कुमार यांना हवाई दलाने बुधवारी दुपारी कार्यालयात तातडीने दाखल होण्यास सांगितले आहे.

यावेळी बोलताना रवी कुमारने सांगितले की, आमच्या वरिष्ठांनी मला 2 वाजता स्पर्धा सोडून परत बोलावले असल्याचे समजले. आगामी परिस्थितीनुसार ते मला सूचना करतील. हवाई दलातील माझे सहकारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. फक्त मी आणि दीपक बाहेर आहोत. एअरफोर्स अलर्टवर आहे. सध्या आम्हाला परत या असेच आदेश आले आहेत. प्रॉटोकॉलनुसार, जेव्हा आम्ही ड्युटीवर नसतो तेव्हाही आम्हाला प्रोटोकॉलनुसारच वागावे लागते, असे रवी कुमार यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रवी आणि दीपक भारतीय हवाई दलात ग्राउंड स्टाफ आहेत. मात्र, आवश्‍यकता भासल्यास आपण युद्धासाठी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत. आमच्यासाठी देश हा प्रथम क्रमांकावर, तर शूटिंग दुसऱ्या स्थानी आहे. जेव्हा जेव्हा देशाला आमची गरज असेल, तेव्हा तेव्हा आम्ही जाणारच, असा निर्धार रवीने व्यक्त केला. रवी आणि दीपक यांनी 10 मीटर एअर रायफल पुरूष आणि एकेरी श्रेणीत भाग घेतलेला आहे. मात्र, ते अंतिम फेरीत दाखल होऊ शकले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)