नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

मुंबई – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना मुंबईतील ब्रेबोन स्टेडियम होत आहे. सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीत भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मिळविलेल्या धडाकेबाज विजयानंतर वेस्ट इंडिजने आगामी दोन्ही सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन करताना दुसरा सामना अनिर्णीत राखला तर तिसऱ्या सामन्यात तब्बल 43 धावांनी विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व गाजवले असून आजच्या सामन्यात भारतीय संघ विजयीरथावर परतण्यास उत्सूक असणार असून विंडीजचा संघ सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाति रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडीजचा संघ – काईरन पॉवेल, चंद्रपॉल हेमराज, शाइ होप, मार्लन सैम्युल्स, शिमरोन हेट्मेयर, रोवमन पॉवेल, जेसन होल्डर, फैबियन एलन, कीमो पॉल, ऐश्ले नर्स, केमार रोच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)