साउदॅम्पटन – गतविजेता ऑस्ट्रेलिया व त्यापाठोपाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही दणदणीत पराभव करणाऱ्या भारताच्या दृष्टीने आज सोपा पेपर आहे. अफगाणिस्तानवर विजय मिळवित उपांत्य फेरीसाठी एक पाऊल पुढे टाकण्याची संधी भारताला मिळणार आहे. मैदानावर व मैदानाबाहेरही खराब प्रदर्शन होत असलेल्या अफगाणिस्तानने शान राखण्यासाठी चांगली कामगिरी करावी अशीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
भारत वि. अफगाणिस्तान हा सामना साउदॅम्पटन येथील रोझ बाऊल येथील मैदानावर थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
💥 TOSS: #ViratKohli has opted to bat in Southampton.
India are yet to lose in #CWC19, Afghanistan are yet to win! Will the tables turn in #INDvAFG? 👀 pic.twitter.com/xykbImcgrb
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 22, 2019