भारताला प्रतीक्षा कसोटी मालिका विजयाची

बर्मिंगहॅम:भारताने इंग्लंडच्या भूमीवर 2007 मध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर तब्बल 11 वर्षांत भारताला ही कामगिरी करता आलेली नाही. भारताने इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी मालिका 1932 मध्ये खेळली होती. परंतु भारताला इंग्लंडच्या भूमीवर पहिली मालिका जिंकण्यासाठी 1971 हे वर्ष उजाडावे लागले.

अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा मान मिळविला. परदेशी भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याची भारताची ती पहिली वेळ होती. तसेच लिटल मास्टर व विक्रमवीर सुनील गावसकर यांची ती पहिली कसोटी मालिका होती. दिलीप वेंगसरकर यांनी ऐतिहासिक अशा लॉर्डस मैदानावर तीन शतके झळकावताना ही कामगिरी करणारा एकमेव परदेशी खेळाडू बनण्याचा मान मिळविला आहे.

भारताने 1932 ते 2017 या कालावधीत इंग्लंडविरुदध इंग्लंडच्या भूमीवर 17 कसोटी मालिका खेळल्या. परंतु त्यातील केवळ 3 मालिका जिंकण्यात भारताला यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)