#AUSvIND : भारताने रचला इतिहास; ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका खिशात

सिडनी – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आज भीमपराक्रम केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची २-१ अशा फरकाने खिशात घातली. तब्बल ७१ वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला आहे. चेतेश्वर पुजाराला सामनावीर आणि मालिकावीराच्या किताबाने गौरविण्यात आले.

तत्पूर्वी, भारतीय संघाने ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती.सिडनी कसोटीत भारताने पहिल्या डावातच ६२२ धावांचा डोंगर उभा केला. परंतु, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर आटोपल्यामुळे त्यांच्यावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. चौथ्या दिवशी बिनबाद ६ धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)