महिला टी20 विश्‍वचषक स्पर्धा 2018 : भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

प्रोव्हिडन्स – हरमनप्रीत कौरची शतकी खेळी आणि तिला जेमीमा रॉड्रीक्‍झने दिलेल्या साथीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या किफायतशीर गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिलासंघाने न्युझीलंडच्या संघाचा 34 धावांनी पराभव करत स्पर्धेत विश्‍वचषक टी-20 स्पर्धेची धडाक्‍यात सुरुवात केली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 194 धावांची मजल मारली. तर, प्रत्युत्तरात फलंदाजी करताना न्युझीलंडच्या महिला संघाला निर्धारीत 20 षटकांत 9 गडी बाद 160 धावाच करता आल्याने त्यांना 34 धावांनी पराभूत व्हावे लागले. यावेळी न्युझीलंडच्या सुझी बेटने एकाकी लढत देत 50 चेंडूत 67 धावांची खेळी केली. यावेळी भारताकडून पूनम यादवने 33 धावा देत 3 गडी बाद केले.

तत्पूर्वी, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रेक्‍झच्या धडाकेबाज खेळीने भारतीय संघाने न्युझीलंडच्या संघासमोर विजयासाठी 195 धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताची सलामीवीर तानिया भाटिया आणि स्मृती मंधना अनुक्रमे 9 आणि 2 धावा करुन परतल्या. तर, दयालन हेमलथा देखिल केवळ 15 धावा करुन परतली.

त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रेक्‍झने जास्त धोके न पत्करता संघाचा डाव सावरला. त्यामुळे 13.2 षटकांत संघाचे शतक फलकावर लागले. यावेळी हरमनप्रीतने आपले सातवे अर्धशतक झळकावले. त्यानंतर जेमीमाने धावांचा वेग वाढवताना आपले चौथे अर्धशतक झळकावले.

यावेळी दोघींनी 12.4 षटकांमध्ये 134 धावांची भागीदारी केली. जेमिमा बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेत चौफेर फटकेबाजी करत आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या शतकासाठी तीने केवळ 49 चेंडू खेळताना 7 चौकार आणि 8 षटकार मारत संघाला 194 धावांची मजल मारली. तर, जेमीमाने 59 धावांची खेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)