INDW vs AUSW : भारताचा आॅस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा : स्मृती मानधना सामनावीर

गयाना – महिला टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत फलंदाज स्मृती मानधनाची 83 धावांची खेळी आणि भारतीय फिरकी गोलंदाज यांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आॅस्ट्रेलिया महिला संघाचा 48 धावांनी पराभव केला. भारतीय महिला संघाचा हा सलग 4 था विजय ठरला.

-Ads-

तत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्यण घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 8 बाद 167 धावा केल्या होत्या. विजयासाठी 168 धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा संघ 19.4 षटकांत 9 बाद 119 धावांच करू शकला. संघाची फलंदाज आणि यष्टीरक्षक एश्ले हीली ही दुखापतग्रस्त झाल्याने फलंदाजीस उतरू शकली नाही.

भारतीय संघाकडून स्मृती मानधनाने 55 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारासह 83 धावा केल्या तर कर्णधार हरमनप्रीतने 27 चेडूंत 43 धावा काढल्या. स्मृती मानधना हिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. भारतीय गोलंदाजीत अनूजा पाटीलने 3 विकेट घेतल्या तर पूनम यादव, राधा यादव आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 विकेटस घेतल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
1 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)