मिताली प्रकरण पोवार यांना भोवले

भारतीय महिला संघासमोर वादाच्या बाहेर येण्याचे आव्हान

नवी दिल्ली – भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक आणि एकदिवसीय प्रकारातील भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज यांच्यातील अंतर्गत वादामुळे भारतीय महिला क्रिकेटमुळे वादळ आले होते. प्रशिक्षक पोवार यांचा कार्यकाल 30 नोव्हेंबरला संपणार असल्याने महिला संघातील वाद हा तात्पुरता तरी संपला आहे. परंतु, पुढील दौऱ्यात महिला संघासमोर वादाच्या बाहेर येण्याचे आव्हान

वेस्ट इंडिजमधील महिला विश्वचषकाच्या वेळी भारतीय संघाला उपांत्यफेरीमध्ये पराभूत व्हावे लागले होते. त्या संघात अनुभवी मिताली राजला स्थान न दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यात मितालीचा एक ई – मेल सार्वजनीक झाला आणि त्यात मितालीने पोवार हे तिची कारकीर्द संपवण्याचा प्रयन्त करत आहेत असा आरोप केला होता. पोवार यांच्याशी बीसीसीआयचा करार संपला असून बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोवार यांचा करार आज संपत आहे आणि त्यांना पुन्हा संधी मिळण्याची खूपच कमी आहे. पोवार यांची नियुक्ती तुषार आरोटे यांनी ऑगस्टमध्ये पदाचा राजीनामा दिल्यावर झाली होती. त्यांच्या राजीनाम्याचे कारण हे, संघातील वरिष्ठ खेळाडूंचेआणि प्रशिक्षकांचे सरावाच्या वेळी येत असलेले मतभेद होते.

पोवार यांचा क्रार्यकाल संपल्यावर टी – 20 प्रकारातील भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि एकदिवसीय प्रकारातील भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हे या वादातून कसे बाहेर येतात हा खूप मोठा मुद्दा आहे. संघाच्या हिताला प्राधान्य देत आपल्यातील वाद मिटवण्याचा धाडस या दोन मोठ्या खेळाडू करतील अन्यथा ड्रेसींग रूम मधील वातावरण बिघडू शकते. 35 वर्षीय मितालीसाठी वादाचे सर्व प्रकरण मागे सोडून देत पुढील न्यूझीलंड दौऱ्यावर लक्ष केंद्रित करण्याचे मोठे मानसिक दडपण असणार आहे.

मिताली राजला उपांत्यफेरीच्या सामन्यातून बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे खुलेआम समर्थन करणाऱ्या हरमनप्रीत कौरने पोवार- मिताली वदावे भाष्य करणे टाळले आहे. यावर मितालीचे असे मत होते की, आमच्यात नेमके काय बिनसले आहे याचा तोडगा आम्हाला सोबत बसून चर्चेतून काढावा लागेल. भारतीय महिला संघाची एकदिवसीय प्रकारातील कर्णधार म्हणून मी हरमनला मी संघातील एक महत्त्वाची खेळाडू मानते आणि संघाचे हित लक्षात घेता आम्हाला मिळून चांगले प्रदर्शन करण्याची गरज आहे.असे मितालीने बीसीसीआयला वादानंतर दिलेल्या स्पष्टीकरणात लिहलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)