#INDvNZ : भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

-स्मृति मंधाना नाबाद 90 धावांची खेळी
-मिताली राज नाबाद 63 धावांची खेळी
-झूलन गोस्वामीच्या 3 विकेटस

माऊंट मोंगानुई -स्मृती मंधाना आणि मिताली राज यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने मंगळवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाचा आठ विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या क्रिकेट मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 9 विकेटसने पराभव केला होता.

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाला 44.2 षटकांत सर्वबाद 161 धावापर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून कर्णधार एमी सैटर्थवेटने सर्वाधिक 71 धावा केल्या. भारताकडून झूलन ने 3 विकेट घेतले. एकता, दिप्ती, पूनम यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर शिखा पांडे हिने 1 विकेट घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्युत्तरात भारताचे सुरूवातीच्या विकेट लवकर पडल्या. सलामीवीर जेमिमा राॅड्रिग्स शून्यावर बाद झाली तर दिप्ती शर्मा 8 धावांवर बाद झाली. भारताची अवस्था 2 बाद 15 अशी झाली असताना त्यानंतर स्मृति आणि मिताली यांनी भारताची धूरा संभाळली. दोघींच्या 151 धावांच्या भागिदारीमुळे भारतीय संघाने 35.2 षटकांत 2 बाद 166 धावा करत विजय संपादित केला.

स्मृति मंधाना ने 82 चेडूंत नाबाद 90 धावा (13 चौकार,1 षटकार) करत आणि कर्णधार मिताली राज हिने नाबाद 63 धावांची (4 चौकार, 2 षटकार) खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. स्मृती मंधाना सामनावीर ठरली.

https://twitter.com/ICC/status/1090148545913647105

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)