#AusvInd 2nd T20 : भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

मेलबर्न – पहिल्या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरी नंतरही भारतीय संघाला पराभूत व्हावे लागल्यानंतर तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करत मालिका वाचविण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.

भारत वि आॅस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यास थोड्याच वेळात मेलबर्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

-Ads-

लागोपाठ सात टी-20 सामन्यांच्या मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाला आठवी मालिका जिंकून रेकॉर्ड करावयाचे असल्यास आजच्या सामन्यात विजय मिळवणे भारतीय संघाला अनिवार्य असणार आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, खलील अहमद


आॅस्ट्रेलिया संघ पुढीलप्रमाणे – डार्सी शॉर्ट, आरोन फ़िंच, क्रिस लिन, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी, एंड्रयू टाई, बेन मैकडरमोट, जेसन बेहरनडोर्फ़, एडम जम्पा, नाथन कूल्टर-नाइल

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)