#AUSvIND : भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

-71 वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यात यश
-अखेरचा कसोटी सामना अनिर्णीत
-चेतेश्‍वर पुजाराला मालिकावीराचा पुरस्कार

सिडनी – विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाची नोंद केली आहे. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली असून तब्बल 72 वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कसोटी मालिका जिंकली आहे. सिडनी कसोटीत सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ सुरूच होऊ शकला नाही. उपहारानंतरही पावसाने विश्रांती न घेतल्याने सामनाधिकाऱ्यांनी सामना अनिर्णित म्हणुन जाहीर केला आणि भारतीय संघाने चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

चौथ्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात 622 धावांवर आपला डाव घोषित केला होता. तर, प्रत्युत्तरात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत गुंडाळून भारताने त्यांना फॉलोऑन दिले होते. अशी कामगिरी करणारा 30 वर्षांमध्ये भारतीय संघ पहिलाच संघ ठरला होता. फॉलोऑन नंतर भारतीय संघ चौथी कसोटीही जिंकेल असे वाटत असताना खेळाच्या चौथ्या दिवसापासून वरुणराजाच्या आगमानामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. रविवारी दिवसभरात केवळ 25 षटकांचा खेळ होऊ शकला. तर, अखेरच्या दिवशी एकाही षटकाचा खेळ झाला नाही त्यामुळे सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला आणि भारतीय संघाने 4 सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अश्‍या फरकाने आपल्या नावे केली.
यावेळी, पहिल्या डावत केलेल्या 193 धावांच्या खेळीसाठी पुजराला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पुजाराने या मालिकेत तीन शतके ठोकून मालिकेतील भारताच्या विजयात मोठा वाटा उचलल्यामुळे मालिका विजयाचाही पुरस्कार त्यालाच देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघाच्या या मालिका विजयात फलंदाजीमध्ये चेतेश्‍वर पुजाराने 521 धावांची खेळी केली. तर, गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 21 बळी मिलवत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. तर, दुसरीकडे ऑस्त्रेलियन संघातून एकाही फलंदाजाला या मालिकेत शतक झळकावता आले नाही. त्यांच्या संघातून सलामीवीर मार्कस हॅरिसने केलेली 79 धावांची खेळी ही सर्वात मोठी खेळी ठरली आहे.

भारताने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत मेलबर्न आणि ऍडलेड कसोटीत विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेयिलाने पर्थ कसोटी जिंकली आहे. तर सिडनी कसोटी अनिर्णित राहीली. भारताने ऑस्ट्रेयिलात 1947 पासून 11 कसोटी मालिका खेळल्या आहेत त्यातील 8 कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आहे. तर 3 कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक –

भारत पहिला डाव – 167.2 षटकांत 7 बाद 622 घोषित (चेतेश्‍वर पुजारा 193, ऋषभ पंत नाबाद 159, रवींद्र जडेजा 81, मयंक अग्रवाल 77, नॅथन लायन 174-4, जोश हेझलवूड 105-2, मिचेल स्टार्क 123-1), ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 104.5 षटकांत सर्वबाद 300 (मार्कस हॅरिस 79, उस्मान ख्वाजा 27, मार्नस लेबसचगने 38, पिटर हॅंडस्कोम्ब 37, मिचेल स्टार्क नाबाद 29, कुलदीप यादव 99-5, रविंद्र जडेजा 73-2, मोहम्मद शमी 58-2, जसप्रीत बुमराह 62-1). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 4 षटकांत बिनबाद 6 (उस्मान ख्वाजा नाबाद 4, मार्कस हॅरिस नाबाद 2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)