भारताचा वेस्टइंडीजला ‘व्हाईट वॉश’ ! शेवटच्या सामन्यात ‘गब्बर’ झळकला

चेन्नई : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यादरम्यान सुरु असलेल्या 20-20 सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये भारताने आज आपली विजयी घौडदौड सुरु ठेवत वेस्टइंडीजला 6 गडी राखून नमवले. शेवटच्या सामन्यामध्ये सुरुवातीच्या फटकेबाजीनंतर भारत सहज हा सामना खिशात घालेल असे चित्र होते मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकातील अलेनच्या चौथ्या चेंडूवर शिखर बाद झाल्याने भारतीय प्रेक्षकांचा श्वास थांबला होता. शेवटच्या चेंडूवर 1 धाव हवी असताना मनीष पांडेने चपळाईने चोरटी धाव घेत भारताला विजय मिळवून दिला. भारतातर्फे शिखर धवन याने सर्वाधिक 92 धावा केल्या. रिषभ पंतने शिखराला चांगली साथ देत आपले पहिले-वहिले आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतक साजरे केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत वेस्टइंडिज तर्फे शाई होप आणि शेमरॉन हेतमायर यांनी केलेल्या वेगवान सुरुवातीनंतर डॅरेन ब्राव्हो आणि निकोलस पुरणयांच्या फटकेबाजी मुळे वेस्ट इंडीजने निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 181 धावांची मजल मारताना भारतासमोर विजयासाठी 182 धावांचे आव्हान ठेवले होते.

यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विंडीजचे सलामीवीर शाई होप आणि शेमरॉन हेतमायरने वेगवान सुरुवात करुन दिली. यावेळी त्याम्नी संघाचे अर्धशतक सहाच षतकांत फलकावर लगावले. मात्र, अर्धशतकानंतर लागलीच चहालने होपला बाद करत ही भागीदारी तोडली. यावेळी होपने 22 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावांची खेळी केली. यानंतर आपल्या पुढच्याच षटकात चहालने हेतमायरला देखिल बादकरत विंडीजच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. हेतमायरने 21 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावांची खेळी केली. तर, त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदीनला केवळ 15 धावांची खेळी करता आल्याने विंडीजला तिसरा धक्‍का बसला.

आजच्या सामन्यात बढती मिळालेल्या निकोलस पूरन आणि डॅरेन ब्राव्होयांनी सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेत वेगाने फलंदाजी करायला सुरूवात केली. यावेळी डॅरेन ब्राव्होने एका बाजुने सावध फलंदाजी केली. तर, दुसऱ्या बाजुने निकोलस पूरनने वेगवान धावा करताना संघाची धावगती वाढवताना संघाला दिडशतकी वेस ओलांडून दिली.

यानंतर डॅरेन ब्राव्होने देखिल फटकेबाजी करत विंडीजच्या धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न केला. तर, निकोलस पूरनने आपल्या धावांचा वेग आणखिन वाढवला आणि खलीलच्या अखेरच्या षटकात तब्बल 24 धावांची वसूली करताना 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने टी-20 मधिल आपले पहिले अर्धशतक झळकावताना नाबाद 53 धावांची खेळी केली. तर, डॅरेन ब्राव्होने 37 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 43 धावांची खेळी करत संघाला 181 धावांचा टप्पा गाठुन दिला. यावेळी भारताकडून युझुवेंद्र चहालने 28 धावांत 2 गडी बाद केले. तर, वॉशिंग्टन सुंदरने 33 धावांत एक बळी मिळवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)