#NZvIND : भारताचा न्यूझीलंडवर 7 विकेटसने विजय

 -भारताची मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी

-मोहम्मद शमी सामनावीर

माऊंट मोंगानुई – रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा तिसरा एकदिवसीय सामन्यात 7 विकेटसने पराभव करत विजय संपादित केला आहे. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मोहम्मद शमीने 9 षटकांत 41 धावा देत तीन गडी बाद केले. त्याला या कामगिरीबदल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

विजयासाठीचे 244 धावांचे आव्हान भारतीय संघाने 43 षटकांत 3 गडी गमावत 245 धावा करत पूर्ण केले. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 62 तर विराट कोहलीने 60 धावा केल्या. शिखर धवन 28 धावांवर बाद झाला. अंबाति रायुडूने नाबाद 40 आणि दिनेश कार्तिकने नाबाद 38 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 2 आणि मिचेल सैंटनरने 1 गडी बाद केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने 49 षटकांत सर्वबाद 243 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने 93 आणि टॉम लॅथमने 51 धावा केल्या.भारताकडून मोहम्मद शमीने 3 तर युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन बळी घेतले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)