भारत विश्‍वचषक जिंकू शकतो – रिकी पॉन्टिंग

मेलबर्न – सध्याच्या कामगिरीचा विचार केला तर भारतीय संघ अथवा इंग्लंडचा संघ आगामी विश्‍वचषक जिंकू शकतो असा दावा ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार आणि सहप्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघही विजेतेपदावर पुन्हा नाव कोरू शकतो असा दावा ही पॉन्टिंगने केला.

माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे वर्षभराच्या बंदीनंतर ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे फलंदाजीला अधिक बळकटी आली असून संघ समतोल झाल्याने ऑस्ट्रेलियादेखील त्यांचा मुकुट कायम राखण्याच्या स्थितीत आहे असे पॉन्टिंग यावेळी म्हणाला. तो म्हणाला, भारत आणि इंग्लंड हे संघ सध्या दमदार दिसत असले तरी ऑस्ट्रेलिया त्यापेक्षा फार मागे नाही.

किंबहुना स्मिथ आणि वॉर्नरच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सक्षम बनला आहे. मी या संघाच्या प्रशिक्षकांपैकी एक असल्यामुळे तसे म्हणत नाही. इंग्लंडमधील वातावरण हे ऑस्ट्रेलियाला अधिक अनुकूल असल्याने माझे मत आहे. तसेच स्मिथ आणि वॉर्नर हे चांगले फलंदाज असण्याबरोबरच ते कोणताही दबाव सहजपणे हाताळू शकतात. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्‍वविजेता होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)