इंग्लंडविरुद्ध विजयी आघाडी घेण्यासाठी भारत प्रयत्नशील

दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

लंडन: पहिल्या एकदिवसीय सामन्यात आठ गडी आणि जवळपास 10 षटके राखून मिळवलेल्या विजयामुळे आत्मविश्‍वास उंचावलेल्या टीम इंडियासमोर उद्या (शनिवार) होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडवर विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे लक्ष्य आहे. इंग्लंडपुढे कुलदीप यादवच्या फिरकीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधण्याचे खडतर आव्हान असणार आहे.

तत्पूर्वी भारताने इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत इंग्लंडसमोर आव्हान निर्माण केले आहे. दुसरा सामनाही भारताने जिंकला तर मालिका गमावण्याची वेळ इंग्लंड संघावर येऊ शकते, त्यामुळे या सामन्यात इंग्लंडचे खेळाडू दडपणाखाली खेळताना दिसून येऊ शकतात. भारतीय संघाला आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टीने एकदिवसीय मालिका एकतर्फी जिंकून इंग्लंडच्या खेळाडूंचा आत्मविश्‍वास खच्ची करण्याची चांगली संधी आहे.

पहिल्या सामन्यांत चांगली सुरुवात मिळूनही इंग्लंडचा संघ कुलदीपच्या फिरकीच्या जाळ्यात अलगद अडकला. एकवेळ बिनबाद 72 धावा करणारा इंग्लंडचा संघ पुढील 4 षटकांतच आपले 4 गडी गमावून बसला. इंग्लंडला यापूर्वीही चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. त्यामुळे सातत्याने अपयशी ठरणाऱ्या मधल्या फळीला सूर गवसण्यासाठी इंग्लंडच्या संघाला योग्य रणनीती आखण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चाहल, कुलदीप यादव, सिद्धार्थ कौल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दूल ठाकूर व भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड – इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, जो रूट, जेक बॉल, टॉम करन, ऍलेक्‍स हेल्स, लियाम प्लंकेट, बेन स्टोक्‍स, आदिल रशीद, डेव्हिड विली व मार्क वूड.
सामन्याची वेळ- सायंकाळी 5-00 पासून.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)