इराणकडून भारताला पुरेसा क्रूडचा पुरवठा होणार 

भारताने केलेल्या प्रयत्नांना मिळाले यश

नवी दिल्ली – भारताच्या दृष्टिकोनातून आपली ऊर्जा सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे भारताला इराणकडून मिळत असलेले क्रुड आगामी काळातही मिळावे याकरीता भारताने अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेने भारताला इराणकडून क्रुडची आयात करण्याची परवानगी दिली असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्‍र्र प्रधान यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, अणुकार्यक्रमावरून अमेरिका आणि इराणचे मतभेद वाढल्यानंतर अमेरिकेने इराणमधून होणाऱ्या तेल आयातीवर निर्बंध घातले होते. त्याची अंमलबजावणी 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, भारताची क्रुडची मोठी गरज पाहता भारताला आयात थांबविणे शक्‍य होणार नसल्याचे भारताने सांगितले आहे. त्याचबरोबर क्रुडचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरीता भारताने इराणकडे क्रुडसाठी मोठी ऑर्डरही दिली आहे.

अमेरिकेने या सर्व बाबीचा विचार करून भारताला आयात करण्यास परवानगी दिला आहे. ते म्हणाले की, भारत तेलाची आयात करू शकणार आहे. त्यामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. एक तर जागतिक बाजारातील तेलाचे दर आता 85 डॉलर प्रति पिंपावरून 72 डॉलरवर आले आहेत. त्यामुळे भारताचा आयातीचा खर्च कमी होत आहे. त्याचबरोबर भारताचा रुपया बळकट होत आहे. त्यामुळे भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेला बसणारे धक्‍के कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. या घडामोडीचा सकारात्मक परिणाम काल शेअरबाजारावरही झाला आणि निर्देशांक वाढल्याचे दिसून आले.

इराणकडून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेने घातलेले निर्बंध येत्या पाच नोव्हेंबरपासून लागू होत असताना अमेरिकेने भारतासह जपान, भारत, दक्षिण कोरिया आणि अन्य काही देशांना इराणकडून तेल विकत घेण्यास अनुमती दिली आहे. इराणची आर्थिक कोंडी करण्याचे ट्रम्प प्रशासनाचे लक्ष्य आहे. सवलत दिलेल्या सर्व देशांना तेल खरेदीमध्ये कपात करावी लागेल. चीनसुद्धा इराणकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. त्यांचीसुद्धा तेल खरेदीतून सवलत मिळवण्यासाठी अमेरिकेबरोबर चर्चा सुरू आहे. सवलत देताना ट्रम्प प्रशासनाला संतुलन साधावे लागणार आहे. या सवलतीमुळे इराणला मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)