विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा

संग्रहित छायाचित्र...

अमेरिकेतही दोन सामने होणार

सेंट जॉन (अँटिग्वा) – भारतीय क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. या दौऱ्यामध्ये भारत व वेस्ट इंडिज यांच्यात फ्लोरिडातील दोन टी-20 लढतींचाही समावेश आहे. भारतीय संघाचा हा दौरा पाच आठवड्यांचा आहे. या दौऱ्यात दोन कसोटी, तीन टी-20, तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. तीन ऑगस्टपासून हा दौरा सुरू होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कसोटी सामने हा आयसीसीच्या जागतिक कसोटी स्पर्धेचाच एक भाग आहे. पहिला कसोटी सामना येथील व्हिव्हियन रिचर्डस स्टेडियमवर 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. दुसरी कसोटी 30 ऑगस्टपासून जमेकामधील सबीना पार्क मैदानावर खेळविली जाईल.

अमेरिकेतील फ्लोरिडाच्या ब्रोवर्ड कौंटी मैदानावर 3 व 4 ऑगस्ट रोजी टी-20 सामने आयोजित केले जाणार आहेत. तिसरा टी-20 सामना त्रिनिदाद येथे 6 ऑगस्ट रोजी होईल. एक दिवसाचा पहिला सामना 8 ऑगस्ट रोजी होईल. दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे 11 व 14 ऑगस्ट रोजी त्रिनिदाद येथे होईल. त्रिनिदाद येथे बऱ्याच कालावधीनंतर भारताचे सामने होणार असल्यामुळे तेथील चाहत्यांनी आत्तापासूनच या सामन्यांची जय्यत तयारी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)