…तर विश्वचषकमध्ये पाकसोबत भारतीय संघ खेळणार नाही – बीसीसीआय  

नवी दिल्ली – एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात ३० मे पासून होणार असून यामध्ये भारत-पाकिस्तान सामना रंगण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. वृत्तानुसार बीसीसीआयही सरकारसोबत आहे. आणि सरकारचा प्रत्येक निर्णय बीसीसीआयला मान्य असणार आहे.

एकदिवसीय विश्वचषकात भारत पाकिस्तानसोबत खेळणार कि नाही याबद्दल बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हंटले कि, विश्वचषक जसा-जसा जवळ येईल. तशी परिस्थिती स्पष्ट होईल. आयसीसीची यामध्ये कोणतीही भूमिका नाही. जर त्यावेळेस आपल्या सरकारला वाटले कि आम्ही खेळायला नाही पाहिजे. तर आम्ही खेळणार नाही. या निर्णयाचा परिणाम असा होईल कि, पाकिस्तानला सामन्याचे पॉईंट मिळतील. आणि अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान असेल तर पाकिस्तान न खेळताच विश्वचषक जिंकेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, याबाबतीत अद्यापही आयसीसीशी चर्चा झाली नाही.

https://twitter.com/ANI/status/1098077825675026432

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)