भारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – शुक्रवारपासून साऱ्या जगात येत्या 48 तासांत इंटरनेट ठप्प होणार अशा बातम्या येत आहेत. बातम्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की, 48 तासांकरिता संपूर्ण जगात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार आहे. रूस येथील वृत्तपत्र रशिया टुडे यांनी एका रिपोर्टमध्ये हा दावा केला होता. मात्र आता सरकारच्या सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, भारतामध्ये ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही.

एका माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय सायबर सिक्युरिटी को-आॅर्डिनेटर गुलशन राय यांनी म्हटलं आहे की, भारतामध्ये इंटरनेट सेवा ठप्प होणार नाही. यासाठी यासाठी दुसऱ्या पर्यांयाची व्यवस्था करण्यात आली आहे.’भारतामध्ये 48 तासांसाठी इंटरनेट बंद होणार, ही बातमी खोटी अाहे’ असे त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, इंटरनेट बंद होण्याची बातमी येऊन आता 20 तास झाले आहेत तरीही कुठेही इंटरनेट ठप्प झाल्याचे समजले नाही. सर्वठिकाणी इंटरनेट सुरळित चालू आहे.

तसेच काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मेन्टेनन्सच्या (देखभालीचे) कामामुळे संपूर्ण जगात फक्त 1 टक्के म्हणजे 36 मिलियन (3.6 करोड) वापरकर्ते यामुळे प्रभावित होऊ शकतात. म्हणजेच 99 टक्के वापरकर्त्यांना इंटरनेट वापराबदल कोणतीही अडचण येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)