नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेत सोमवारी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने इंग्लंडवर 4 विकेट राखून विजय मिळवित अ गटात अव्वलस्थान पटकावले. इंग्लंडचा संघ या गटात दुसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे टी20 महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा उपांत्य सामना 23 नोव्हेंबर (शुक्रवारी) रोजी रंगणार आहे. तर दुसरीकडे 22 नोव्हेंबर (गुरूवारी) रोजी आॅस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज याच्यांत पहिली उपांत्य लढत होईल.
India will face England in the second semifinals on Friday after the West Indies defeated 2009 champions by four wickets in their last group match of the ICC Women's World T20 . pic.twitter.com/alqOJ8G1UP
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 20, 2018
दरम्यान, महिला विश्वचषक टी-20 स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्म मध्ये असून भारतीय संघाने मालिकेतील आपले चारही सामने एकतर्फी जिंकताना गट ब मधून पहिले स्थान पटकावित उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा