‘रहाणे आणि पंत’ शतक करण्यास अपयशी; भारत सर्वबाद 367

भारतीय संघाने घेतली 56 धावांची आघाडी

हैदराबाद – कालच्या 4 बाद 308 धावांवरून पुढे खेळताना तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा अंजिक्य रहाणे पाचवा बळी ठरला. कालच्या स्वतच्या धावसंख्येत रहाणे केवळ 5 धावांची भर टाकू शकला आणि 80 धावां करून बाद झाला.  त्यांनतर आलेल्या रविंद्र जडेजा याला भोपळाही फोडता आला.

-Ads-

ऋषभ पंत हा 85 धावांवरून पुढे खेळताना आपले शतक पूर्ण करेल अशी क्रिकेट रसिकांची आशा होती, मात्र त्यांची आशा फोल ठरली. ऋषभ पंत 92 धावां करून बाद झाला. कुलदीप यादव 6 तर उमेश यादव 2 धावांवर बाद झाले.

ताज्या वृत्तांनुसार तिसऱ्या दिवशी चहापानसाठी खेळला थांबला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या सर्वबाद 367 झाली असून भारतीय संघानी वेस्टइंडिजच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा 56 धावांनी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाची दहावी विकेट रविचंद्रन अश्विनच्या स्वरूपात पडली. अश्विन 35 धावांवर बाद झाला. तर शार्दुल ठाकून हा 4 धावांवर नाबाद राहिला.शार्दुल आणि अाश्विन यांनी दहाव्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)