मैदानात प्रवेश करत ‘या’ खेळाडूसोबत चाहत्याने घेतला सेल्फी

हैदराबाद – भारत आणि वेस्टइंडिज याच्यांत हैदराबाद येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. यावेळी सामना सुरू असताना एक चाहता विराट कोहली याला भेटण्यास मैदानावर पोहचला. त्याने विराटची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षारक्षकांनी त्याआधीच त्याला पकडून मैदानाबाहेर नेले.

मैदानात घुसलेल्या चाहत्याने भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यांसोबत सेल्फी सुध्दा काढला. यापूर्वी राजकोट कसोटी दरम्यानसुध्दा दोन व्यक्तींनी मैदानात प्रवेश करत कोहली सोबत सेल्फी घेतला होता.

वेस्टइंडिजचा पहिला डाव सुरू असताना 15 व्या षटकांदरम्यान कोहली मिडविकेट वर क्षेत्ररक्षण करत होता, त्याचदरम्यान सुरक्षारक्षकांना चुकवत एक चाहता मैदानात आला, आणि त्याने कोहलीसोबत सेल्फी घेतला. त्यानंतर अंपायरने ड्रिंक्सची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)