पहिल्या दिवसअखेर वेस्टइंडिज 7 बाद 295; कुलदीप, उमेशचे 3 बळी

हैदराबाद – भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना आज पासून हैदराबाद येथे सुरू झाला. आज सकाळी वेस्टइंडिज कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर वेस्टइंडिजने खेळ थांबला तेव्हा 95 षटकांत 7 बाद 295 धावा केल्या आहेत.

खेळपट्टीवर राॅसटन चेज 98 धावांवर तर देवेंद्र बिशु  हा फलंदाज  2 धावांवर नाबाद आहे. सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजीसमोर वेस्टइंडिज संघाची अवस्था 5 बाद 113 अशी झाली होती. मात्र देवेंद्र बिशुने वेस्टइंडिज संघाची एक बाजू संभाळत धावसंख्या 295 पर्यंत नेली.

-Ads-

भारतीय गोलंदाजीत उमेश यादव, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर रविचंद्रन आश्विन याने 1 गडी बाद केला. रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांना मात्र आज एकही गडी बाद करता आला नाही. उद्या सकाळच्या सत्रात वेस्टइंडिज संघाला लवकर माघारी धाडण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)