वेस्ट इंडिजचा संघ आॅक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर, पुण्यातही रंगणार सामना

भारत विरूध्द वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक जाहिर

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहिर केले आहे. 4 आॅक्टोबर ते 11 नोव्हेंबर यादरम्यान भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये दोन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने होणार आहेत.

भारतीय क्रिकेट संघ आशिया कप झाल्यानंतर लगेचच वेस्टइंडिज विरूध्द घरगुती मालिकेत उतरणार आहे. या दौऱ्यात वेस्टइंडिज भारताविरूध्द कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 ते 8 आॅक्टोबर या कालावधीत राजकोटला तर दुसरा सामना 12 ते 16 आॅक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे खेळणार आहे. कसोटीनंतर 21 आॅक्टोबर 2018 ते 5 नोव्हेंबर 2018 कालावधीत पाच एकदिवसीय सामने रंगणार आहेत. तसेच  4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर तीन टी-20 सामने रंगणार आहेत.

भारत विरूध्द वेस्टइंडिज मालिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –

कसोटी मालिका

पहिला सामना- 4 ते 8 आॅक्टोबर-राकोट
दुसरा सामना – 12 ते 16 आॅक्टोबर -हैदराबाद

एकदिवसीय मालिका

पहिला सामना- 21 आॅक्टोबर- गुवाहटी
दुसरा सामना- 24 आॅक्टोबर-इंदुर
तिसरा सामना – 27 आॅक्टोबर-पुणे
चौथा सामना – 29 आॅक्टोबर- मुंबई
पाचवा सामना – 5 नोव्हेंबर – तिरूवनंतपुरम

टी-20 मालिका

पहिला सामना – 4 नोव्हेंबर-कोलकत्ता
दुसरा सामना -6 नोव्हेंबर -लखनऊ
तिसरा सामना – 11 नोव्हेंबर-चेन्नई


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)