जाणून घ्या…. ‘भारत विरूध्द वेस्ट इंडिज’ मालिकेचे वेळापत्रक

दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने रंगणार

नवी दिल्ली – भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये 4 आॅक्टोबर ते 11 नोव्हेंबर यादरम्यान दोन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने होणार आहेत.

-Ads-

आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करत सातव्यांदा आशिया कप आपल्या नावे करणारा भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिज विरूध्द घरगुती मालिकेत उतरत आहे. या दौऱ्यातील भारत विरूध्द वेस्टइंडिज याच्यांतील कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 ते 8 आॅक्टोबर या कालावधीत राजकोटला तर दुसरा सामना 12 ते 16 आॅक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे रंगणार आहे. कसोटीनंतर 21 आॅक्टोबर 2018 ते 5 नोव्हेंबर 2018 कालावधीत पाच एकदिवसीय सामने रंगणार आहेत. तसेच  4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर तीन टी-20 सामने रंगणार आहेत.

भारत विरूध्द वेस्टइंडिज मालिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –

कसोटी मालिका

पहिला सामना- 4 ते 8 आॅक्टोबर-राकोट
दुसरा सामना – 12 ते 16 आॅक्टोबर -हैदराबाद

 

एकदिवसीय मालिका

पहिला सामना- 21 आॅक्टोबर- गुवाहटी
दुसरा सामना- 24 आॅक्टोबर-इंदुर
तिसरा सामना – 27 आॅक्टोबर-पुणे
चौथा सामना – 29 आॅक्टोबर- मुंबई
पाचवा सामना – 5 नोव्हेंबर – तिरूवनंतपुरम

 

टी-20 मालिका

पहिला सामना – 4 नोव्हेंबर-कोलकत्ता
दुसरा सामना -6 नोव्हेंबर -लखनऊ
तिसरा सामना – 11 नोव्हेंबर-चेन्नई


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)