भारतासमोर विंडीजचे कडवे आव्हान

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 क्रिकेट मालिका : धोनी आणि कोहलीच्या अनुपस्थीत रोहितकडे नेतृत्व

कोलकाता  – भारताचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थीतीत आज भारतासमोर टी-20 विश्‍वचषक विजेत्या वेस्ट इंडीजचे कडवे आव्हान असणार आहे. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले असून धोनीच्या जागी भारतीय संघात ऋषभ पंतची वर्णी लागली आहे.

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिके पाठोपाठ एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला असून आता या दोघांमध्ये आजपासून टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असल्याने विंडीजचे आव्हान अजुनच जास्त धारदार झालेले वाटणार आहे. मात्र, यावेळी विश्‍वचषक विजेत्या संघातील डॅरेन सॅमी, डॅरेन ब्राव्हो, ख्रिस गेल सारख्या तगड्या खेळाडूंची अनुपस्थिती विंडीजला नक्‍कीच जाणवनार आहे.

मात्र, कसोटी मालिके नंतर एकदिवसीय मालिकेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या विंडीजच्या संघाला मालिकेत विजय मिळवणे आवश्‍यक असणार आहे. त्यातच कार्लोस ब्रेथवेटच्या नेतृत्वाखाली विंडीजच्या संघात आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड हे फलंदाज पुनरागमन करत आहेत.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धमाकेदार कामगिरी करणारा शिमरॉन हेतमायर देखिल टी-20 संघात असनार आहे त्यामुळे विंडीजला विश्‍वविजेत्या संघातील खेळाडूंची अनुपस्थीती जाणवणार नाही. तर, 2016साली विश्‍वविजय मिळवून देणारा ब्रेथवेट देखिल विंडीज संघात पुनरागमन करत असल्याने भारतीय गोलंदाजांची कसोटी या मालिकेत लागणार आहे.

त्यातच भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध अखेरचा टी-20 विजय 2014 मधील टी-20 विश्‍वचषकात मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघाला विंडीज विरुद्ध विजय मिळवण्यात अपयश आले आहे. त्यातच भारतीय संघात धोनी आणि कोहलीयांचा समावेश नसल्याने रोहित शर्माला भारतीय संघाला विंडीजविरुद्ध विजय मिळवून देत अपयशाची मालिका संपवण्याचे लक्ष्य असणार आहे.

यावेळी लोकेश राहुल कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस उतरण्याची शक्‍यता असून राहुल नंतर दिनेश कार्तिकवर मधल्याफळी ची जबाबदारी असणार आहे. तर, महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतकडे यष्टीरक्षणा सोबतच संघाच्या विजयात हातभार लावण्याची महत्वपूर्न जबाबदारी या सामन्यात असनार आहे. तसेच भारतीय संघात हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाया अष्टपैलू खेळाडूंच्या अनुपस्थितीत केवळ कृनाल पांड्याकडे महत्वाची जवाबदारी असणार आहे.

यावेळी भारतीय संघाने मालिकेसाठी पाच फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. तर, चार वेगवान गोलंदाज संघात समाविस्ट केले अहेत. ज्यात, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. तर, फिरकी गोलंदाजांमध्ये युझुवेंद्र चहाल, कुलदीप यादव, कृनाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि शबाद नदीमयांचा समावेश असणार आहे. त्यात अंतीम संघात केवळ दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूची निवद केली जाण्याची शक्‍यता आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृनाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझुवेंद्र चहाल, कुलदिप यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शहाबाझ नदीम.

वेस्ट इंडीज – कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), फॅबिएन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेतमायर, किमो पॉल, कायरन पोलार्ड, दिनेश रामदिन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, शेरफाने रुदरफोर्ड, ओश्‍ने थॉमस, खॅरी पिअर्रे, ओबेद मेकॉय, रोव्हमन पॉवेल, निकोलस पूरन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)