#INDvWI : भारतासमोर विजयासाठी 105 धावांचे लक्ष्य

तिरूवअनंतपुरम – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सुरु असलेया  एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने भारतासमोर 105 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना तिरूवअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय गोलदांजासमोर वेस्टइडींजचा संघ 31.5 षटकांत सर्वबाद 104 धावांच करू शकला.

वेस्ट इडींज फलंदाजीत जेसन होल्डर याने सर्वाधिक 25 तर मार्लन सैम्युल्सने 24, रोवमन पाॅवेलने 16 धावा केल्या. भारतीय गोलंदाजीत रविंद्र जडेजा याने सर्वाधिक 4 बळी घेतले. खलील अहमद, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 तर कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)