श्रीलंकेचा इंग्लंडवर 24 धावांनी विजय

गोवा – गोव्यामध्ये सुरु असलेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या तिरंगी मालिकेतील आजच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने इंग्लंडचा 24 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारीत 20 षटकांत 205 धावा करुन इंग्लंडसमोर विजयासाठी 206 धावाम्चे आव्हान ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात फलंदाजी करताना इंग्लंडला निर्धारीत 20 षटकांत केवळ 181 धावांच करता आल्याने इंग्लंडचा 24 धावांनी पराभव झाला.

नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार प्रियांथा कुमार याने प्रथम फलंदानी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत श्रीलंकेच्या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी रचली. त्यानंतर इंग्लंडने एका मागोमाग श्रीलंकेचे 4 फलंदाज बाद केले, मात्र, तोपर्यंत श्रीलंकेच्या संघाने 200 धावांचा टप्पा पार केला होता. यावेळी श्रीलंकेने 20 षटकांमध्ये 205 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सावध सुरुवात केली.

-Ads-

सलामीची दोन्ही फलंदाज त्यांच्या अर्धशतकांपर्यंत पोहोचले आणि सामन्यावर पकड मिळवली. परंतु श्रीलंकेच्या अनुभवी गोलंदाजांनी खेळाच्या शेवटी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडला 20 षटकांमध्ये 181 धावांवर रोखून 24 धावांनी विजय मिळविला. भारताविरुद्ध अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी उद्या हे संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)