भारताविरुद्ध मालिका व्हावी यासाठी पीसीबी आग्रही

कराची – पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका व्हावी आणि त्याचा पाठपुरवठा करणे ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) जबादारी आहे, असे कराचीत एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मणी यावेळी पुढे बोलताना म्हणाले, आयसीसीमध्ये असलेल्या सर्व देशांची द्विपक्षिय मालिका व्हावी, यासाठी आयसीसीमध्ये अधिकारी असताना मी अनेकदा आग्रही होतो. परंतु, सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष या नात्याने मी आणखी प्रभावीपणे माझी भूमिका घेऊ शकतो. आयसीसीने प्रत्येक देशाला अशा द्विपक्षीय मालिका खेळण्यास तयार केलं पाहिजे. त्याबाबतचा पाठपुरवठा करणे ही आयसीसीची जबाबदारी आहे. जर भारत आणि पाकिस्तान हे देश द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळात नाहीत तर ते आयसीसीच्या स्पर्धांमध्ये तरी का आपआपसात खेळतात? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थीत केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात 2007 नंतर एकही द्विपक्षीय मालिका खेळवली गेली नाही. 2007 मध्ये पाकिस्तानने भारतात शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 2008 मध्ये मुंबईमध्ये अतिरेकी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबत क्रिकेट न खेळण्याची भूमिका घेतली होती. परंतु, आयसीसीच्या काही निर्णयांचा मान राखत पाकिस्तान सोबत भारताने एक मर्यादीत षटकांची मालिका खेळली. 2012-13 मध्ये पाकिस्तानचा क्रिकेट संघ एक मर्यादित षटकांची मालिका खेळवण्यासाठी भारतात आला.

परंतु त्या मालिकेत एकही कसोटी सामना खेळवला गेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पीसीबी यांच्यात झालेल्या करारानुसार भारताने नियोजीत पूर्ण द्विपक्षीय मालिका खेळवली नाही. त्यामुळे पीसीबीने आयसीसीच्या तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली. त्यात त्यांनी भारताकडून 70 मिलियन अमेरिकन डॉलर इतक्‍या रकमेची भरपाई मागितली होती.

बीसीसीआय हे आयसीसीच्या सामंजस्य करारांचा सन्मान करत नाही अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच टीका करत असते. तर बीसीसीआय हा करार बंधनकरार नाही अशी आपली बाजू मांडत असते. याबाबतीत बोलताना मणी म्हणाले, दोन देशांची क्रिकेट मंडळे आयसीसीमध्ये एकमेकांविरुद्ध प्रथमच कायदेशीर लढा लढवत आहेत, हे आयसीसीच्या इतिहासात प्रथमच होत आहे.यामध्ये मला वाटते की, दोन्ही देशांनी आपापसात चर्चा करून हा मुद्दा संपविला पाहिजे. दोन्ही देशांच्या सरकारांनी देखील यात चर्चा केली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.

इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यात 2004 मध्ये देखील राजकीय वैमनस्य आले होते. परंतु, चर्चा करून त्यांनी आपली राजकीय भूमिका आणि क्रिकेट यांना वेगवेगळे स्थान दिले आणि क्रिकेट खेळले. जर पाकिस्तानचे म्हणणे आयसीसीने फेटाळले तर ते पुन्हा आवाज उठवतील. आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहोत. परंतु, द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आम्ही समांतर चर्चेस प्राधान्य देऊ, असेही मणी यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)