भारत-ओमान सराव सामना बरोबरीत

अबू धाबी – आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या अगोदर आयोजित भारत विरुद्ध ओमान संघाचा सराव सामना गोलशून्य बरोबरीत सुटला आहे. फिफाच्या क्रमवारीनुसार भारतापेक्षा बलाढय असलेल्या ओमान संघाने अनेकवेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय संघाचा भक्‍कम बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले.

भारताने या सराव सामन्यात आपल्या संघातील जास्तीत जास्त खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून खेळण्याची संधी दिली. फिफा क्रमवारीत ओमान 82 व्या तर भारत 97 व्या स्थानी आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या सत्रात भारतीय संघाने पहिल्या सत्रात काही आक्रमक चाली रचल्या. परंतु, त्याचे रूपांतर गोलामध्ये करण्यात अपयश आले. त्यामुळे पहिले सत्र गोलशून्य राहिले. दुसऱ्या सत्रात नियमित आघाडीपटू जेजे ऐवजी बलवंत सिंग मैदानात उतरला तर बचावफळीतील खेळाडू देखील बदलण्यात आले.

गोलरक्षक गुरप्रीतला बदलून भारतीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाइन यांनी अमरिंदरला सराव दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दुसऱ्या सत्रात देखील दोन्ही संघाना गोलकोंडी फोडण्यात अपयश आल्याने अखेर सामना बरोबरीत सुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)