#INDVNZ : विजयी लय राखण्याचे भारतासमोर लक्ष्य

हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाची शक्‍यता

स्थळ : माऊंट मोंगानुई
वेळ : स. 7.30 वा.

माऊंट मोंगानुई – भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना माऊंट माऊंगानुई येथे आज रंगणार असून पहिल्या सामन्यातील एकतर्फी विजयानंतर दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवून आपली विजयीलय कायम राखण्यासाठी भारतीय संघ उत्सूक असून आजच्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्यास भारतीय संघ प्रयत्नशील असणार आहे. तर, पहिला सामना गमावल्यानंतर आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात न्यूझीलंडचा संघ असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी एकदिवसीय विश्‍वचषकापूर्वी भारतीय संघाचा अखेरचा परदेश दौरा असल्याणे भारतीय संघ या मालिकेत संपुर्ण ताकदीनिशी उतरताना दिसून येणार आहे. कारण, विश्‍वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाला या मालिकेत आपल्या संघातील सातत्याने अपयशी ठरणाऱ्या मधल्याफळीतील फलंदाजांची चाचपणी करण्याची हीच एकमेव संधी असणार आहे. त्यातच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फलंदाजीतून संघाला विजय मिळवून देत आपला गमावलेला फॉर्म पुन्हा मिळवला आहे.

मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात धोनी वगळता इतर मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश भारतीय संघाला पुन्हा चिंता करायला लावणारे होते. ज्यात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या अंबाती रायुडूच्या अपयशाने संघाची चिंता वाढवली आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत न्यूझीलंडची गोलंदाजी दर्जेदार असल्याने इतरही भारतीय फलंदाजांचाही या मालिकेत कस लागतो आहे. त्यात पहिल्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा अपयशी ठरला होता तर शिखर धवनने चांगली फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे सध्या तरी धवनच्या फॉर्मात परतण्याने भारतीय संघासमोरील थोडी चिंता जरी कमी झालेली असली तरी रोहित शर्माचे अपयश संघासमोरील चिंता वाढवणारे आहे.

तर, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्‍वरकुमार व मोहम्मद शमी यांना साथ देणारा समर्थ पर्याय अद्याप भारतीय संघाला सापडला नसला तरी पहिल्या सामन्यात शमीने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघा समोरील चिंता थोडी कमी केली आहे. तर, हार्दिक पांड्यावरिल बंदी उठवली असल्याने या सामन्यातून तो पुनरागमन करण्याची शक्‍यता वर्तवली जात असून हार्दिकला जर अंतिम संघात स्थान मिळाल्यास विजय शंकरला बाहेर बसवले जाऊ शकते. मात्र, या सामन्यात पांड्याची खेळण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकरची निवड पक्की समजली जात आहे.

तर, लोकेश राहुलाचा पर्याय म्हणुन संघात स्थान मिळालेल्या शुभमन गिलला पदार्पणासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. या दौऱ्यातील अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे गिलला चौथ्या सामन्यात संधी मिळू शकते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी मिळून सहा बळी घेतल्यामुळे दुसऱ्या सामन्यातही हीच जोडी कायम ठेवली जाण्याची जास्त शक्‍यता असून अष्टपैलू रवींद्र जडेजाला पुन्हा अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्‍यता कमीच आहे.

त्यातच, जर न्यूझीलंडमधील मालिकांचा इतिहास भारताच्या बाजूने फारसा नसल्याचे लक्षात येते. येथे खेळलेल्या 36 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताला केवळ 11 सामने जिंकता आले आहेत. यापूर्वी, 2014 मध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिका 4-0 अशी एकतर्फी गमवावी लागली होती. तर, माऊंट मोंगानुईच्या मैदानावर न्यूझीलंडने आतापर्यंत सहा एकदिवसीय सामने खेळलेले असून त्यापैकी तीन सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले आहे तर तीन सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला होता.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, विजय शंकर, शुभमन गिल, खलील अहमद, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, कॉलिन मुन्‍रो, हेन्‍री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साउदी, रॉस टेलर, कॉलिन डीग्रॅंडहोम, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, मॅट हॅन्‍री.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)