#AUSvIND : कसोटीत भारत भक्‍कम स्थितीत

दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 598 धावांची आघाडी

सिडनी  -चेतेश्‍वर पुजारा आणि ऋषभ पंत यांचे दीडशतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने पहिल्या डावात 167.2 षटकांत 7 बाद 622 धावांची मजल मारताना आपला पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 10 षटकांत बिनबाद 24 धावांची मजल मारली असून अद्याप ते 598 धावांनी पिछाडीवर आहेत.
पहिल्या दिवशी मयंक अग्रवाल आणि चेतेश्‍वर पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना हैराण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुजाराने पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. दुसऱ्या दिवशी पुजारासोबत हनुमाने आपल्या डावाला सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पुजारा आणि विहारीने चांगली केली. मात्र, संघाच्या कालच्या धावसंख्येत 26 धावांची भर घातल्यानंतर विहारी लायनच्या गोलंदाजीवर स्विप शॉट मारण्याच्या प्रयत्नात 42 धावांवर शॉर्ट लेगकडे झेल देऊन परतला. यावेळी पुजारा आणि हनुमाने पाचव्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पुजारा आणि पंत दोघेही सावध खेळी करत होते.

यावेळी पंतला 35 धावांवर असताना जीवदान मिळाले. त्याने लायनला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा फटका लॉंग ऑनवर त्याचा झेल सोडला गेला. त्यामुळे पंतला जीवदान मिळाले. यानंतर द्विशतकाच्या जवळ पोहोचलेल्या पुजरालाही जीवदान मिळाले. मात्र, पुजाराला जीवदानाचा फायदा उचलता आला नाही. पुजारा लायनच्याच गोलंदाजीवर त्याच्याकडेच झेल देऊन 193 धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या रवींद्र जडेजाला साथीत घेत पंतने डावाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.

दोघांनी चौफेर फटकेबाजी करत भारताला 500 धावांची मजल मारून दिली. दरम्यान, पंतने आपले कसोटीतील दुसरे शतक पूर्ण केले. पंत ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. शतकानंतरही पंत अणि जडेजाने आपली तुफान फटकेबाजी चालूच ठेवत भारताला 600 धावांचा टप्पा ओलांडून दिला. दरम्यान, जडेजाने आपले अर्धशतक आणि पंतने दीडशतक पूर्ण केले. पंतने 15 चौकारांच्या मदतीने नाबाद 159 धावा ठोकल्या. रवीद्र जेडेजाही आपले शतक पूर्ण करेल असे वाटत असताना, 81 धावांवर लायनने त्याचा त्रिफळा उडवला. जडेजा बाद झाल्यावर भारताने आपला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला.

संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव 167.2 षटकांत 7 बाद 622 घोषित (चेतेश्‍वर पुजारा 193, ऋषभ पंत नाबाद 159, रवींद्र जडेजा 81, मयंक अग्रवाल 77, नॅथन लायन 174-4, जोश हेझलवूड 105-2, मिचेल स्टार्क 123-1), ऑस्ट्रेलिया पहिला डाव 10 षटकांत बिनबाद 24 (मार्कस हॅरिस नाबाद 19, उस्मान ख्वाजा नाबाद 5).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)