#AusvInd : भारताची खराब सुरूवात, विजयासाठी 289 धावांचे आव्हान

सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज पहिला एक दिवसीय सामना सिडनी येथे सुरू असून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 289 धावांचे आव्हान ठेवले आहे. विजयासाठी 289 धावांचा पाठलाग करताना भारताची खराब सुरूवात झाली असून सुरूवातीचे 3 फलंदाज केवळ 4 धावांत माघारी परतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताचा सलामीवीर शिखर धवनला भोपळाही फोडता आला नाही, त्यानंतर फलंदाजीस आलेला भारतीय कर्णधार कोहली  3 धावा काढून बाद झाला. अंबाति रायुडूही शून्यावर बाद झाला.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 17 षटकांत 3 बाद 53 धावा झाल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर रोहित शर्मा नाबाद 32 आणि एम.एस.धोनी नाबाद 13 धावावर खेळत असून भारताला विजयासाठी 198 चेडूंत 236 धावांची आवश्यकता आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पीटर हैडसकाॅब्म, उस्मान ख्वाजा आणि शाॅन मार्श यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतासमोर 289 धावांचे आव्हान उभारले. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 5 बाद 288 धावा केल्या आहेत. भारताकडून भुवनेश्वर, कुलदीपने प्रत्येकी 2 तर जडेजाने 1 गडी बाद केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)