दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया बिनबाद 24, भारत मजबूत स्थितीत

सिडनी – ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 8 षटकं बाकी असताना आपला पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्या व्दिशतकी भागिदारीच्या जोरावर भारताने 600 धावांचा टप्पा ओलांडला. रवींद्र जडेजा हा 81 धावांवर बाद होताच कोहलीने डावाची घोषणा केली. ऋषभ पंत हा 159 धावांवर नाबाद राहिला.

पहिल्या दिवसाच्या 4 बाद 303 वरून पुढे खेळताना हनुमा विहारी हा पाचवा बळी ठरला. विहारी 42 धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजारा बाद झाला. पूजाराने सर्वाधिक 193 धावा केल्या, त्याचे व्दिशतक अवघ्या 7 धावांनी हुकले. त्यानंतर सातव्या विकेटसाठी पंत आणि जडेजाने 204 धावांची भागिदारी करत भारताला 600 धावांचा टप्पा ओलाडूंन दिला.

ऑस्ट्रेलियाकडून नाथन लायनने 4, जोश हेजलवूडने 2 गडी बाद केले. दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 24 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मार्कस हॅरिस नाबाद 19 आणि उस्मान ख्वाजा हा 5 धावांवर खेळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)