भारत_वि_ऑस्ट्रेलिया टी20 क्रिकेट मालिका : भारताला विजय अनिवार्य

सिडनी  – पावसाचे साम्राज्य असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना आज (रविवार) होणार असून मालिकेत पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला होता. तर, दुसऱ्या सामन्यात आलेल्या पावसाच्या व्यत्ययाने तो सामना रद्द घोषीत केल्याने भारत मालिकेत 1-0ने पिछडीवर पडला आहे. त्यामुळे मालिकेत पराभव टाळुन बरोबरी करण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला डकवर्थ लुईसच्या नियमाचा फटका बसला. त्यामुळे भारतीय संघाला केवळ चार धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळ्र ऑस्ट्रेलियाला लागोपाठ सहाव्यांदा पराभूत करण्याची संधी भारताने यावेळी गमावली होती. तर, ऑस्ट्रेलियाने यावेळी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.

मात्र, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पहिल्याच षटकापासून वर्चस्व गाजवताना दिसून आला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजी करताना 19 षटकांत केवळ 132 धावांचीच मजल मारता आली होती. मात्र, पावसाच्या व्यत्ययाने भारताची मालिकेत बरोबरी करण्याची संधी हिरावली गेली होती. त्यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडेच 1-0 अशी विजयी आघाडी कायम राहिली होती.

त्यातच भारताने लागोपाठ सात टी-20 मालिकांमध्ये विजय मिळवल्यानंतर आठवा मालिका विजय मिळवण्याची भारतीय संघाची संधी देखिल हुकली आहे. त्यामुळे किमान मालिका बरोबरीत सोडविण्याची संधी भारतीय संघाकडे असून आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असणार आहे.

पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या कृनाल पांड्या आणि खलील अहमदने दुसऱ्या सामन्यात यशस्वी पुनरागमन करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवले होते. तर, पहिल्या सामन्यात खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा पहायला मिळाली आहे. आता अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला आपल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासहीत फलंदाजीत देखिल कमालिचे सातत्य राखणे गरजेचे असणार आहे.

त्यातच सिडनी क्रिकेटा ग्राऊंडची खेळपट्टी ही आठवढा भारापुर्वी शेफिल्ड शिल्ड सामन्यांसाठी वापरली गेली होती. त्यामुळे ती खेळपट्टी सध्या तरी संथ गतीची असून वेगवान गोलंदाजांना तितकिशी लाभदायक नसल्याची जानवते आहे. तर, सिडनीचे तापमान पहाता तेथे आजच्या सामन्यात पावसाची शक्‍यता कमी असल्याचेही सांगितले जात आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि युझूवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), ऍश्‍टॉन अगर, जेसन बेहेरेनड्रॉफ, ऍलेक्‍स केरी, नॅथन कुल्टर-नाईल, ख्रीस लिन, बेन मॅकडेरेमोट, ग्लेन मॅक्‍सवेल, डार्सी शॉर्ट, बिली स्टॅंक्‍ले, मार्कस स्टोईनिस, अँड्रयु टाई, ऍडम झम्पा.

स्थळ – सिडनी क्रिकेट ग्राऊंड  वेळ – दुपारी 1.30


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
37 :thumbsup:
38 :heart:
7 :joy:
8 :heart_eyes:
19 :blush:
4 :cry:
52 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)