कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

मेलबर्न  – सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये सध्या टी-20 सामन्यांची मालिका सुरू असून यानंतर होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमधिल पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषना करण्यात आली आहे.

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या परतीचे मार्ग बंद झाले असून या मालिकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धदाकेबाज सलामीवीर मार्कस हॅरिस आणि वेगवान गोलंदाज ख्रीस ट्रेमेनयांचा संघात समावेश केला. असून, त्यांच्या संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक टीम पेनकडे सोपवण्यात आलेले आहे.

तसेच दुखापतीतून सावरलेला उस्मान ख्वाजाचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीतून सावरलेला ख्वाजा भारतासाठी मालिकेत डोकेदुखी ठरू शकतो. पाकिस्तान दौऱ्यातील संघात समावेश नसलेला पीटर हॅंड्‌सकोम्बचाही संघात समावेश केला गेला असून तो या सामन्यातून पुनरागमन करणार आहे. तर, मिचेल मार्श आणि जेश हेझलवूडया दोघांकडे उपकर्णधारपदाचा भार सोपवला गेला आहे.

तसेच गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला ख्वाजा स्थानीक स्तरावर होत असलेल्या शेफिल्ड शिल्ड क्रिकेट मालिकेत क्विंन्सलंड संघाचे नेतृत्व करणार असून त्याला भारता विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सरावाची तेवढीच संधी शिल्लक आहे. त्यामुळे तो त्यास्परधेत कशी कामगिरी करतोयावर त्याचे संघातील स्थान अवलंबून असले तरी पाकिस्तान विरुद्धच्या दौऱ्यात ख्वाजाहा ऑस्ट्रेलियन संघातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळे त्याचे संघातील स्थान जवळपास निश्‍चीत मानले जात आहे.

तर, ऑस्ट्रेलियाच्या संघात पदार्पणवीर असणारा आणि व्हिक्‍टोरीया क्‍लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मार्कस हॅरिसने शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत नाबाद 250 धावांची खेळी करून निवडसमितिचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. या स्पर्धेत त्याने 87.40 च्या सरासरीने धावा बनविल्या आहेत. त्यामुळे त्याची अंतिम संघामधिल निवड पक्‍की समजली जात असून निवडलेल्या 14 सदस्यांपैकी उर्वरित 2 खेळाडूंना संघ निवडीनंतर स्थानिक क्रिकेट मध्ये पुन्हा खेळण्याची परवानगी दिली जाणार आहे असे निवड समितीच्या ट्रॅव्हर होन्स यांनी यावेळी सांगितले आहे.

कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीचा ऑस्ट्रेलियाचा संघ –

टीम पेन (कर्णधार व यष्टीरक्षक), मार्कस हॅरिस, ऍरोन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, पिटर हॅंडस्कॉंब, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, नॅथन लॉयन, पीटर सिडल, ख्रिस ट्रेमेन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)