भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी : भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला रोखले

ऍडलेड  – ऑफ स्पिनर आर. अश्विनचे तीन बळी आणि अन्य भारतीय जलदगती गोलंदाजांनी केलेल्या किफायतशीर गोलंदाजीच्या बळावर पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाला 7 बाद 191 धावत रोखण्यात भारताला यश आले आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडे 59 धावांची आघाडी कायम असून ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद होणे बाकी आहेत.

तत्पूर्वी, भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु केला तेव्हा भारताचे 9 बाद 250 अशी धावसंख्या होती. दुसर्या दिवशी धावसंख्येत भर घालण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले. जोशे हेजलवूडने शमीला बाद करत भारताचा डाव 250 धावावरच मर्यादित ठेवला. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली .

इशांत शर्माने सलामीवीर ऍरॉन फिंचला फोपळाही फोडू न देता आत येणाऱ्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्याने खराब चेंडूवरच धावा घेण्याचा पवित्रा अवलंबून संयमी फलंदाजी केली. पहिल्याच षटकात बळी मिळविल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या यशासाठी 21व्या षटकाची प्रतीक्षा करावी लागली.

हॅरीसला अश्विनच्या फिरकीचा योग्य अंदाज बांधता आला नाही तो 26 धावा करून मुरली विजयाकडे झेल देऊन परतला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या अनुभवी श्वान मार्शचा त्रिफळा उडवत अश्विनने भारताला तिसरे यश मिळवून दिले. मार्श केवळ 2 धावा करून बाद झाला. मार्श बाद झाल्यावर पीटर हॅंड्‌सकोम्ब फलंदाजीस ला. त्याने ख्वाजासह डाव सावरण्याचा पर्यन्त केला. या दोन खळाडूंमध्ये 28 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर संयमी खेळी करणारा ख्वाजा अश्विनचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक ऋषभपंतकडे झेल देऊन परतला. त्याने 125 चेंडूचा सामना करताना 28 धावा केल्या.

ख्वाजा बाद झाल्यावर ट्रेव्हिस हेड फलंदाजीस आला त्याने हॅंड्‌सकोम्बसह खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करण्यावर भर दिला. त्याने साकारात्मक खेळ करत जम बसल्यावर खराब चेंडूचा समाचार घेतला. हॅंड्‌सकोम्ब हा बुमराहच्या एका अप्रतिम चेंडूवर यष्टीरक्षकाकडे झले देऊन बाद झाला.त्यानंतर आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही, त्याने 5 धावा बनविल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 6बाद 127 अशी झाली होती.

त्यानंतर हेड आणि कमिन्स याचे जोडी जमली. दोंघाने भारतीय मारा खंबीरपणे खेळून काढला. परंतु, नवीन चेंडू हाती येतात बुमराहने कमिन्सला बाद करून भारताला सातवे यश मिळवून दिले. त्यानंतर आणखी बळी मिळवण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसअखेर 88 षटकात ऑस्ट्रेलियाने 7 बाद 191 धावा केल्या.

यात मिचेल स्टार्क 8 धावा आणि हेड 61 धावांवर खेळत आहेत. या तिसऱ्या दिवशी या हेडचा अडसर लवकर दूर करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. सर्व अनुभवी फलंदाज स्वस्तात बाद होत असताना नवोदित ट्रेव्हिस हेडने ऑस्ट्रेलियाचा डाव खंबीरपणे सांभाळला आहे. भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाला सर्वबाद करण्यात जरी अपयश आले असले तरी अचूक मारा करत त्याची धावसंख्येवर अंकुश ठेवण्याची किमया गोलंदाजांनी केली आहे.

आर. अश्विन याने सर्वाधिक 3 बळी मिळवले तर ईशांत शर्मा आणि बुमराह यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत आपली भूमिका चोख बजावली. मोहमद शमीला फलंदाजाला बाद करण्यात अपयश आले परंतु त्याने चांगली गोलंदाजी करत धावसंख्या आटोक्‍यात राहील याची दक्षता घेतली. चार मुख्य गोलंदाजासह खेळणाऱ्या भारतीय संघाला एका गोलंदाजांची कमतरता भासली.

संक्षिप्त धावफलक – ऍरॉन फिंच 0 ( टरफल, गो. ईशांत शर्मा), मार्कस हॅरिस26 (झेल-विजय, गो. अश्विन), उस्मान ख्वाजा 28 ( झेल- ऋषभ पंत, गो. अश्विन), श्वान मार्श 2( त्रिफळा गो. अश्विन), पीटर हॅंड्‌सकोम्ब34( झेल, पंत , गो. बुमराह), ट्रेव्हिस हेड (नाबाद 61 ) टिम पेन 5 ( झेल-पंत, गो. शर्मा ), पेट कमिन्स10(पायचीत गो. बुमराह), मिचेल स्टार्क नाबाद 8


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)