#AUSvIND : भारताच्या विजयात पावसाचा अडथळा

-चौथ्या दिवशीचा खेळ पावसाने थांबवला
-ऑस्ट्रेलियाला पहिल्याडावात फॉलोऑन
-कुलदीप यादवचे पाच बळी

सिडनी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने दिलेल्या 622 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांमध्येच संपुष्टात आल्यानंतर त्यांना पहिल्या डावात फॉलोऑन सामना करावा लागल्यानंतर दुसऱ्या डावात त्यांची बिनबाद 6 अशी मजल मारल्यानंतर पडलेल्या पावसाने चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे आता पाचव्या दिवशी भारताला ऑस्ट्रेलियाचा सर्व संघ बाद करण्याचे आव्हान असून पावसाने पाचव्या दिवशी हजेरी लावू नये अशी प्रार्थना देखिल भारतीय संघातील खेळाडू करत असतील.

यावेळी, कुलदीपने 99 धावा देत ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद केले. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 300 धावांवर तंबूत परतला आणि फॉलोऑनची नामुष्की आली. ऑस्ट्रेलियावर आता भारताची 322 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या डावासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात उतरले. पण आणखी बळी घेण्याची कुलदीप यादवची संधी पावसाने हिरावून घेतली. दुसऱ्या डावात 4 षटकांचाच खेळ होऊ शकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी, लंचनंतर काही वेळाने सामन्यास सुरुवात झाली आणि भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यास सुरुवात केली. भारताने दिवसाच्या पहिल्या षटकानंतर लेगेचच दुसरा नवीन चेंडू घेतला. नवीन चेंडू घेतल्या घेतल्या शामीने कमिन्सचा त्रिफळा उडवला. कमिन्स पाठोपाठ 37 धावांवर खेळणाऱ्या हॅंडस्कबचाही बुमराहने त्रिफळा उडवून कांगारुंची अवस्था 8 बाद 257 अशी केली.

हॅंडस्कोम्ब बाद झाल्यावर आलेल्या लायनने कुलदीपला स्विप मारण्याचा प्रयत्न केले. पण, तो हुकला आणि पायचीत झाला. तर, ऑस्ट्रेलियाची स्टार्क-हेजलवूड ही अखेरची जोडी मैदानात आली. या जोडीने जास्तीजास्त धावा करण्यासाठी हवेतून शॉट खेळण्यास सुरुवात केली. त्यांची बॅटिंग पाहून ते केव्हाही बाद होतील असे वाटत होते. पण, या हावाई फायर करणाऱ्या अखेरच्या जोडीने 42 धावांची भर घातली. अखेर कुलदीपने हेजलवूडला पायचीत करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव बरोबर 300 धावांवर संपवला. कुलदीपने या सामन्यात प्रभावी मारा करत 99 धावादेत पाच फलंदाजांना बाद केले. त्याला शमी, जडेजाने 2 तर बुमराहने 1 गडी बाद करुन चांगली साथ दिली.

त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात फक्त 4 षटकांचाच खेळ होउ शकला. यात ऑस्ट्रेलियाने 6 धावा केल्या. यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. पावसाची थांबण्याची चिन्हे नाहीत हे पाहून चौथ्या दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित करण्यात आले. खेळ संपला त्यावेळी ख्वाजा 4 तर हॅरिस 2 धावांवर नाबाद होते.

संक्षिप्त धावफलक –

भारत पहिला डाव – 167.2 षटकांत 7 बाद 622 घोषित (चेतेश्‍वर पुजारा 193, ऋषभ पंत नाबाद 159, रवींद्र जडेजा 81, मयंक अग्रवाल 77, नॅथन लायन 174-4, जोश हेझलवूड 105-2, मिचेल स्टार्क 123-1), ऑस्ट्रेलिया पहिला डाव 104.5 षटकांत सर्वबाद 300 (मार्कस हॅरिस 79, उस्मान ख्वाजा 27, मार्नस लेबसचगने 38, पिटर हॅंडस्कोम्ब 37, मिचेल स्टार्क नाबाद 29, कुलदीप यादव 99-5, रविंद्र जडेजा 73-2, मोहम्मद शमी 58-2, जसप्रीत बुमराह 62-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)