तिसऱ्या कसोटीत भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका

मेलबर्न्स – मेलबर्न कसोटीत भारताचे पारडे जड झाल्याचे दिसताच ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी भारतीय संघातील खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका करायला सुरूवात केल्याचा दावा एका स्थानीक वेबसाईटने केला आहे आणि त्यांच्याकडे याबाबतचा असलेला पुरावा त्यांनी तो पुरावा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा पुरावा व्हिक्‍टोरिया पोलीस आणि स्टेडियमच्या व्यवस्थापकांना पाठवला आहे.

मेलबर्न स्टेडियमच्या ग्रेट सदर्न स्टॅंड्‌सचा एका भागातील दर्शक भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका करताना दिसत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची गंभीर दखल घेतली असून दर्शकांना ताकीद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्‌याने सांगितले की, व्हिक्‍टोरिया पोलीस आणि स्टेडियमचे सुरक्षा विभाग चाहत्यांवर लक्ष ठेवणार आहेत. त्यांना नियमांची जाण करून देण्यात येणार आहे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना स्टेडियमबाहेर काढण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)