भारतासमोर दुबळ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिका

स्थळ – सिडनी
वेळ – स. 7.50 वा.

सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज पहिला एक दिवसीय सामना खेळवला जाणार असून भारतीय संघ या मालिकेकडे विश्‍वचषकापूर्वीच्या सराव सामन्यांच्या रुपाने पहाणार असून ऑस्ट्रेलिया संघाला विश्‍वचषकाच्या दृष्टीने आपल्या संघाच्या बांधनीसाठी ही मालिका उपयोगी ठरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1ने पराभव केल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करुन भारतीय संघ नविन वर्षातील पहिली एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या तयारीत असणार आहे. तर, बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर अडचणींचा सामना करत कामगिरी खालावलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी संतुलीत संघ निवडण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

त्यातच सिडनी क्रिकेट मैदानावरील खेळपट्टीचे स्वरुप पहाता सामन्यात भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह खेळताना दिसून येऊ शकेल. त्यातच विराटने सांगितले की, पांड्या ऐवजी जडेजाचा अंतिम संघात समावेश केला जाणार असून कुलदीप यादव सह फिरकी गोलंदाजाची भुमिका तो बजावेल. तर, केदार जाधवकडे अतिरिक्त गोलंदाजीचा भार ही सोपवण्यात येणार असल्याचेही यावेळी त्याने सांगितले आहे.

तर, दुसरीकडे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली असल्याने अंतीम संघात भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद सिराज किंवा खलील अहमद आणि मोहम्मद शमीची निवड होऊ शकेल. तर, मधल्याफळीचा भार धोनी आणि रायुडू यांच्यावर सोपवला जाणार असून दिनेश कार्तिकला अंतिम संघात स्थान मिळणे थोडे अवघड असल्याचेही समजते. त्यातच धोनीसाठी 2018 हे वर्ष खराब गेले असल्याने त्याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे.

कारण विश्‍वचषकाच्या दृष्टीने त्याचे लयीत येणे भारतीय संघासाठी महत्वपूर्ण असणार आहे. तर, दुसरीकडे भारतीय संघाने अंबाती रायुडूला संघात समाविष्ट करुन चौथ्या क्रमांकावर महत्वपूर्ण जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे. त्याने 2018 मध्ये 11 सामन्यांमध्ये 56 च्या सरासरीने 392 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा
समावेश आहे.

प्रतिस्पर्धी संघ – भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझुवेंद्र चहाल, रविंद्र जडेजा, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), ऍलेक्‍स केरी (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हॅण्डस्कोम्ब, मार्कस स्टोईनिस, ग्लेन मॅक्‍सवेल, नॅथन लायन, पिटर सिडल, जेह्य रिचर्डसन, जेसन बेहेरेनडॉर्फ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)