…तर आमच्यावर टीका झाली असती – जस्टीन लॅंगर

अडलेड – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत असताना भारतीय खेळाडू ज्याप्रकारे आनंद साजरा करता होते त्यावर ऑस्ट्रेल्याचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर टीका करताना म्हणाले, जर आम्ही अश्‍या प्रकारे आनंद साजरा केला असता तर जगभरातून आमच्यावर टीका झाली असती आणि आमच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्तीत केले गेले असते.

भारताचा पहिला डाव 250 धावांवर संपुष्टात आल्यावर फलंदाजीस आलेले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ठरावीक अंतराने बाद होत होते. त्यामुळे भारतीय खेळाडू उत्स्फुर्तपणे जल्लोष करत होते. विशेषतः पहिल्या षटकात अनुभवी ऍरॉन फिंच फोपळाही न फोडता बाद झाला तेव्हा विराट कोहलीने केलेले आक्रमक जल्लोष सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता.

त्यानंतर जसे -जसे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत गेले तसे -तसे भारतीयांनी त्यांना नामोहरम करण्याची कोणतीच संधी सोडली नाही. चेंडू छेडछाड प्रकरणा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अडकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या नैसर्गीक खेळात बदल झाला आहे. त्यामुळे ते बाचाबाची आणि अन्य वादांपासून लांब राहून संघाची डागाळलेली परातीमा सुधारण्याचा प्रयन्त करत आहेत.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक पुढे म्हणाले, आपल्या सर्वांना खेळाप्रती असलेले वेड आवडते. परंतु, दुसर्या खेळाडूला हिणवून जर तुम्ही आनंद व्यक्त करत असाल तर ते चुकीचे आहे. तुमच्या आक्रमक सेलेब्रेशनची एक वैशिट्य सीमा असायला हवी आणि ती कोणीही ओलांडू नये, असेही ते पुढे म्हणाले.

भारताचा महान माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केल्या साथ फलंदाजीवर ट्‌विट करत टीका केले होती. तो म्हणाला, ऑस्ट्रेलिया संघाकडून अश्‍या प्रकारची संथ फलंदाजी मी कधीही पहिली नव्हती. त्यांना धावा करायच्या नसून फक्त आपली विकेट सांभाळायची आहे.

भारतीय संघाने त्यांच्या या बचावात्मक भूमिकेचा फायदा घेत सामना हातातून जाऊ देऊ नये. याबाबत उतार देताना लॅंगर म्हणाले, मी सचिनचा तो ट्‌विट पहिला आहे.आमचे खेळाडू प्रत्येक वेळी धावा जमवण्याचा प्रयन्त करत होते. परंतु भारताचे गोलंदाज हे अचूक टप्प्यावर गोलंदाज करत होते आणि ही खेळपट्टी गोलंदाजना मदत करत असल्याने त्यांना धावा बनवण्यासाठी वेवेगळे पर्याय वापरावे लागत होते. सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघात नवोदित खेळाडूंचा आभारणा आहे. हा संघ मागील ऑस्ट्रेलियाच्या संघासारखा फलंदाजीत मजबूत नाही,असेही, लॅंगर यावेळी म्हणाले.

यावेळी सर ऍलन बॉर्डरच्या नावाचा उल्लेख करताना लॅंगर म्हणाले, मी त्यांची फलंदाजी बघून हे समजलो आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला संयमी फलंदाजी करून जास्तीत जास्त टिकून संधीची प्रतीक्षा करावे लागते. परंतु, सध्याच्या टी 20च्या युगात त्याप्रकारचे क्रिकेट नाहीशे होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
5 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)